Wednesday, January 26, 2011

Traffic

 
आयुष्य अशा वळणावर येऊन थांबलय,
जिथे सर्व ट्राफिक आपले प्रॉब्लेम घेऊन जमलंय
emotion च्या गाडीने विचारांना ठोकलय,
विचारांच पुढूनच बोनेट वाकलय
प्रणयाची गाडी प्रेमाला overtake करायला गेली,
समोरून सुबुद्धी आली आणि ठोकून गेली
दु:खाचा कंटेनर मधेच वाट अडवून उभा आहे,
प्रयत्नांच्या बाईकला मात्र बाजूने जागा आहे
भावनांची बस गच्च भरून उभी राहिली,
कारण आसवांच्या पेट्रोलची टाकीच लिक झाली
वाट बघतोय कधी सुखांची गाडी येईल सायरन वाजवत,
आणि आनंदाचा हवालदार सोडवेल "ट्राफिक" शिटी वाजवत.

No comments: