तुझ्या आगमनी वसंत फुलतो,
तुझ्या तालावर निसर्ग झुलतो I
तुलाच बघण्या सूर्य उगवतो
तुझ्या रूपावर चंद्रही भुलतो II
ज्योत दिव्याची तुझ्याच नयनी
आणते प्रकाश माझ्या जीवनी I
तू माझीच रहावीस जन्मोजन्मी
ओढ सदा अशीच माझ्या मनी II
रूप तुझे जणू पहाट सुंदर
पाहून विसरतो सारे क्षणभर I
स्मित तुझे जणू हर्ष सरोवर
अखंड सौख्य तुज देवो ईश्वर II
मोरपिसापरी स्पर्श तुझा
अप्सरे लाजवेल वर्ण तुझा I
ठोका चुकेल हृदयी माझा
न मिळाला जर सहवास तुझा II
असंख्य आभार त्या देवाचे
जीवन सुंदर केले माझे I
आता तूच कारण माझ्या जगण्याचे
स्वप्न जीवन रंगवू तुझे अन माझे II

No comments:
Post a Comment