Friday, March 9, 2012

अंधार

लहानपणीच्या फ्रॉकची जागा मोठेपणी वन पीस ने घेतलेय,
गोड गोड पापाचं नाव पण मोठेपणी फ्रेंच किस झालंय...
पूर्वी स्वसंरक्षणासाठी वाढणारे दंड आता Impression साठी वाढतायत,
सहावी सातवीतच मुलं बाळ मोबाईलसाठी रडतायत.....
खो-खो, लगोरी लापाछुपिच्या जागी कार्टून ने टुणकन उडी मारलेय,
मैदानी खेळ सुद्धा आता videogame मध्येच समाविष्ट झालेत....
कॉलेजला जाताना गाडीच लागते मग पालक काढतायत लोन,
अभ्यासाच्या नावाखाली रात्रंदिवस चालू असतात फोन...
शाळा-कॉलेज शिकण्यासाठी असतात हे विद्यार्थीच विसरलेत,
गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड मात्र शाळेपासूनच compulsory झालेत...
शुभंकरोतीच्या वेळी मॉलमध्ये उपस्थित राहणं गरजेच असतं,
पूर्ण कुटुंब जेवताना एकत्र फक्त हॉटेल मध्येच बसतं....
क्लासरूम पेक्षा आजकाल लॉजवरच गर्दी जास्त असते,
कॉलेजबाहेर बुकस्टोल पेक्षा मेडिकल आणि बारचीच गरज असते....
बाबा ओरडतील नाही म्हणायचं, म्हणायचं बाप चढेल माझा,
मी बापाबरोबरच प्यायला बसतो, या गोष्टीचाच गाजावाजा.....
पुढच्या पिढीचं भविष्य वाचवणं आहे आई वडिलांच्या हाती,
नाहीतर पाश्चात्य संस्कृतीच्या मागे आपली होणार माती !!!!!!

Sunday, September 4, 2011

शहाणपण

प्रयत्न केल्याशिवाय आयुष्य सफल कसं होईल,
देवाने स्वत: जिंकायला युद्ध केली, त्याची नुसती भक्ती करून यश कसं येईल
मांजर आडवी गेली म्हणून परत फिरलात तर माणूस पुढे कसा जाईल,
ज्याचं नावच दु:खहर्ता, त्याची सोंड उजवीकडे असली तर तो दु:ख कसा देईल
मिळालं नाही यश तर नशीबातच नाही म्हणून प्रयत्न करणं सोडायचं नसतं,
आयुष्य आपलं, निर्णय आपले, प्रयत्नांनी नशीब बदलायचं असतं
लोकांना नाही आवडत म्हणून संस्कार विसरून वाहायचे नसते,
us कंपनीत गेलं की प्यायलाच लागते, असं म्हणून दारू, सिगारेट प्यायची नसते
सगळे करतात म्हणून मी करतो, असं म्हणून जगायचं नसतं,
जो सगळ्यात वेगळा असतो तोच प्रसिद्ध होतो, हे विसरायचं नसतं
संगतीनेच संस्कार बिघडतात, म्हणून वाईट सांगत ठेवायची नसते,
स्वत:च शहाणपण, सुबुद्धी जागरूक ठेवायची असते.....

मनोगत

 तुम्हाला झोपायला छान गाद्या उशा असतात,
आम्हाला मात्र ब्रिजखालचा रस्ता, फूटपाथ खुले असतात
तुमच रडणं थांबवायला तुमचे आईवडील असतात,
आम्हाला तुमच्या  आईवडिलांचे गाडीतून सहानुभूतीने बघणारे डोळे असतात
तुमचं मन रमवायला गेम, कार्टून असतात,
आमची मन रस्त्यावरच्या गाड्या, accidents बघूनच रमतात
तुम्ही गाड्यांमधून आम्हाला, आम्ही गाड्यांमध्ये तुम्हाला बघत असतो,
तुम्ही आमच्यासारखे कधीच न होण्याची, आम्ही तुमचं जीवन जगण्याची स्वप्नं बघत असतो
तुम्ही दुसऱ्यावर रागावून शिवीत आमचं नाव घेता भिकारी,
पण तुमच्यासारख्याने १० रुपये जरी दिले तरी वाटते ती लॉटरी
तुमचे वडील तुम्हाला मोठं करण्यासाठी कमावतात,
आमच्याकडे मात्र आमच्या कमाईवर रात्री दारू पितात
तुम्हाला सणासुदीला मिळतात नवे कोरे महागडे कपडे,
आम्हाला तुमचेच वापरलेले जुने, जे अंगाला होतात वेडेवाकडे
नका करू आम्हाला मदत, आणि इज्जतही देऊ नका,
पण कृपा करून भिकारी या शब्दाचा शिवी म्हणून वापर करू नका...
 
 

Saturday, August 20, 2011

प्रेमाचा पाढा

प्रेम एके प्रेम,
प्रेम दुने मन आनंदी,
प्रेम त्रिक romance, स्वप्न
प्रेम चोक जीवन-मरणाच्या शपथा,
प्रेमा पाचे रुसवे फुगवे,
प्रेम सक भांडणं,
प्रेमा साते अबोला,
प्रेमा आठे दुरावा,
प्रेम नव्वे प्रेम भंग,
प्रेमा दाहे दु:ख फक्त दु:ख

Saturday, July 16, 2011

प्रेम

स्वप्न पूर्ण होत नाहीत तरी मन काही ऐकत नाही,
तीच तीच स्वप्न पुन्हा बघितल्याशिवाय मन कुठे रमत नाही
का कुणास ठाऊक पण मनाचा लागतच नाही ठाव,
मन तिच्यासाठीच रडतंय जिने मनावर घातलाय घाव
सकाळी मन म्हणत आता तिची प्रतिमा पूर्णपणे पुसून टाकायची,
संध्याकाळी मात्र ते बदलतं, म्हणतं तिची अजून एकदा समजूत काढायची
ती गेलेय सोडून कायमची एकट्याला हे मनाला कळतंय,
पण तिच्याच आठवणींनी मात्र ते सदा कळवळतय
तिने दिलेल्या जखमांनी हे मन नेहमी रडत बसेल,
पण तिच्यासाठीच प्रेम मात्र मनाच्या एका कोपऱ्यात कायम असेल.......

Monday, July 4, 2011

प्रेम

जगात खरच प्रेम असतं,
तर कोणतंच फुल कोमेजल नसतं
प्रेमाचा मोबदला प्रेम असतं,
तर कोणीच आज दु:खी नसतं
प्रेम खरच देवाने निर्माण केलं असतं,
तर प्रेमासाठी कोणीच देवापुढेच रडलं नसतं
प्रेमाने खरच जग जिंकता आलं असतं,
तर कोणीच कोणावर राज्यच केलं नसतं
प्रेम वगरे सगळं झूठ असतं,
कारण सगळं जग स्वार्थी असतं........
 

Saturday, June 18, 2011

मी तुला विसरलोय.....

फक्त श्वास घेताना तुझी आठवण येते,
               पण मी तुला विसरलोय.....
खाताना तू भरवलेल्या घासाची आठवण येते,
                पण मी तुला विसरलोय.....
पाणी पिताना सुद्धा अर्ध-अर्ध प्यायलेल्या कोल्डड्रिंकची आठवण येते,
                पण मी तुला विसरलोय.....
बसमधून जाताना रिक्षात तुला मारलेल्या मिठीची आठवण येते,
                पण मी तुला विसरलोय.....
मोबाईलवर बोलताना तुझ्या मोबाईल मधल्या pics ची आठवण येते,
                पण मी तुला विसरलोय.....
एखादं couple पाहिलं कि आपण एकत्र घालवलेल्या क्षणांची आठवण येते,
                पण मी तुला विसरलोय.....
झोपताना रोज, तुझ्याबरोबर बघितलेल्या स्वप्नांची आठवण येते,
                पण मी तुला विसरलोय.....
झोपेतून उठलो कि झोपेत स्वप्नात तुलाच बघितल्याची आठवण होते,
                पण मी तुला विसरलोय.....
जबरदस्ती हसताना तुझ्या गोड smile ची आठवण येते,
                पण मी तुला विसरलोय.....
रडताना प्रत्येक अश्रूबरोबर तुझी आठवण येते,
                पण मी तुला विसरलोय.....
तुला विसरायचं असं ठरवताना तुझी आठवण येते,
                पण मी तुला विसरलोय.....
मी तुला विसरलोय असं सतत मनाला समजावताना तुझी आठवण येते,
                पण मी तुला विसरलोय.....