मंद मंद पावसात लाईटस चा झुरका,
त्याबरोबर कटिंगचा गरम गरम भुरका.
कट्ट्यावर गरम कांदा भजीची प्लेट,
मग काय होणार ऑफिसला थोडासा लेट.
तेव्हाच जाते चिंब भिजलेली item समोरून,
मन म्हणू लागते जोरात एक सर यावी सरीमागून.
पिकनिकचे प्लान ठरतात सगळ्यांना चढतो जोर,
माळशेज घाट नाचू लागतो डोळ्यांसमोर.

No comments:
Post a Comment