Sunday, January 9, 2011

शिक्षणाच्या आयचा घो

आज आहे दहावीचा निकाल, कोणी येणार पहिला, दुसरा तर कोणाचा नंबर चार,
या सगळ्यांना मिळेल हवे तिथे admission पण बाकीच्यांचा  कोण करतय विचार
क्लासवाले कामावतायत अमाप पैसा सांगून आम्ही दिलेलीच प्रश्नपत्रिका येणार,
पण आधीच प्रश्नपत्रिका देऊन विद्यार्थ्यांचं होतंय बौद्धिक नुकसान ते कोण भरून देणार
या शिक्षण मंडळालाच पहिलीपासून पुन्हा शिक्षण दिले पाहिजे,
तेव्हाच यांना कळेल हि शिक्षण पद्धती का बदलली पाहिजे
काय तर म्हणे best of 5 करून व्हा बिन्धास्त पास,
५ विषयांच्या जोरावर १ विषय मारून नेणाऱ्याला सगळे म्हणतायत शाब्बास
दप्तराच ओझं घेऊन जाणारा काळात नाही विद्यार्थी का कामगार,
क्लासेसच्या कमाई समोर शिक्षकांनाही कमी वाटतोय पगार
भारत जिंकता नाही आला सिकंदराला हे सांगणाऱ्या धड्याच नाव जगज्जेता सिकंदर,
यांनाच नाही कळत काय शिकवायचे जे उपयोगी पडेल शालेय शिक्षणानंतर
हे कायम हेच शिकवणार अपयश हि यशाची पहिली पायरी,
पण यांचीच नसते अपयश पचवायची मनाची तयारी
पालक बोम्बलतायत पाल्यांच्या मागे ठो ठो,
मग खरच म्हणावेसे वाटते या शिक्षणाच्या आयचा घो.

No comments: