अमावस्येची होती रात्र, जंगलात दाटला होता अंधार,
तो वाट चुकला होता एकटाच जाताना घाबरला होता फार
रातकिड्यांची ती किरकिर आणि वटवाघुळान्चा तो चित्कार,
त्याचं अर्ध अवसान गळलं होत, तो पडला होत गार
मधेच जंगली श्वापदांचा ओरडण्याचा आवाज येत होता,
तो प्रत्येक आवाजाने अजूनच भीतीने थरथर कापत होता
कोणाची तरी किंकाळी मधेच आसमंत घुमवत होती,
"मी नाही घाबरत कुणाला" ही त्याची फुशारकी त्याला आठवत होती
तो चालून, घाबरून, धावून घामाने पार भिजला होता,
झाडांचा मधेच सळसळाट त्याच्या हृदयाचा ठोका चुकवत होता
सतत कुठल्यातरी सावल्या त्याचा पाठलाग करत होत्या,
अमावस्येच्या न दिसणाऱ्या चांदण्याच त्याच्या सोबती होत्या
कोणाचा तरी हात खांद्यावर पडला आणि तो मागे फिरला,
तेवढ्यात मंद लाईट लागले आणि इंटरवल झाला.............
No comments:
Post a Comment