Sunday, January 30, 2011

लग्नातली फजिती

पाहताच तिला विसरून गेलो सगळ काही,
लग्नाच्या त्या AC हॉल मधेही अंगाची झाली लाही लाही
जरी मरीची काय म्हणतात तशी साडी होती तिची लाल,
त्यालाच शोभणारे लालबुंद तिचे गाल
तिला पाहून विचार आला जणू स्वर्गातील अप्सरा,
वाट बघत होतो कधी वळेल हिची नजर माझ्याकडे जरा
म्हटले कारण काढून विचारू मुलाकडील का मुलीकडील तुम्ही गेस्ट?
नंतर विचार केला कोणाकडची का असेना आपल्याला तर वाटली लै बेस्ट
शोधत होतो तिच्या घोळक्यात कोणी आहे का ओळखीचं,
पण आठवलं आपल्या नशीबात अशा वेळी कोणी नसतं ओळखी-पाळखीच
विचार केला स्टेजवर गिफ्ट द्यायला ती जाईल तेव्हाच जाऊ,
पण मन नाही तयार झालं, कारण नवरदेवाला माहित होतं मी किती आगाऊ
थोडा प्रयत्न केल्यावर कळलं तीच आडनाव कुलकर्णी नाव होतं प्रणाली,
तेवढ्यात आवाज ऐकला ती कोणालातरी निघूया म्हणाली
विचार केला हिला निघतानाच दारात अडवूया,
माझ्याकडे वेळ होता म्हटलं थोडा पाठलागच करूया
काय झालं कोणास ठाऊक मी अचानक तिला अडवलं,
कोणाचा तरी धक्का लागला तेव्हा मी जागेपणीच स्वप्नात असल्याचं जाणवलं
आता कुलकर्णीच होतं आडनाव म्हणजे वेगळच असणार गोत्र,
नशीब माझं थोर ती बाहेर जाताना दिसलं......तिच्या गळ्यात होतं मंगळसूत्र....... :-(

No comments: