भरकटलेल्या मनात आठवण फक्त तुझी,
भ्रमात होतो मी, होशील तू माझी.....
पाकळी एवढ्या मनात आभाळा एवढी आठवण,
प्रेमात पोळलेल्या मनाची रणरणत्या उन्हात वणवण
मैत्रीच्या झाडाखाली मिळते क्षणभर विश्रांती,
प्रेमामागे मात्र कायमच भ्रमंती
स्वार्थी जगात हवेय आपुलकीची चादर,
खरं प्रेम हवय नको सहानुभूतीची नजर
प्रेमात होरपळलेल्या मनाला वाटतायत सारी नाती लहान,
कारण ताक नाही भागवू शकत दुधाची तहान.

1 comment:
khup chhan.
Post a Comment