हरवून गेलंय ते बालपण या जीवनाच्या प्रवासात,
सोनेरी होते ते दिवस घालवले जे कंटाळवाण्या वाटणाऱ्या अभ्यासात
आता कोणीच सांगत नाही अभ्यास कर, दिवसभर खेळू नको,
परीक्षेला पेपर नीट वाच उगाच घाई करू नको
आता homework केला नाही म्हणून कोणीच मारत नाही,
शेवटच्या बेंचवर बसून लपून डबा खायला डबाच कोणी देत नाही
तेव्हा नेहमीच वाटायचा आपण केव्हा मोठे होऊन पैसे कमावणार,
पण खरंच तेव्हा का कळत नव्हतं हे सुंदर बालपण आपण गमावणार
दर वर्षी येणारी नवीन पुस्तकं वाटायची तेव्हा कंटाळवाणी,
पण त्या बालपणीच्या पुस्तकांविना जीवनात आलेय आणीबाणी
तो अभ्यास, ती शाळा, ते मित्रं, त्या सहली, सगळं काही हरवून गेलं,
या तारुण्याच्या तरुणाने बालपण मात्र हिरावून नेलं.

2 comments:
ज्ञान्या!
मस्त आहे रे स्फुट ..रोजच्या आयुष्यात गुंतलेल्या प्रत्येकाच्या मनातल्या भावनेला वाट करुन दिली आहेस ..छान लिहितो आहेस असाच लिहित रहा....
thanks tai
Post a Comment