न फिटे कधी हे भ्रष्टाचाराचे जाळे,
आम्ही असेच सदैव आनंदी आंधळे
लाच दिल्याविना न कोणे काम होई,
गुराखीच आता गुरांचा चारा खाई
जाता येत सदा लाच देगा देवा,
मी सरकारी नोकर, जमवीन भरपूर ठेवा
लोक संरक्षण जावो चुलीत, मी भ्रष्टाचाऱ्यांच्या जाईन ओलीस,
रोज जर ४००-५०० सुटत राहिले तरच होईन पोलीस
नगरसेवक आमदार निधीतून नेहमी खाईन पैसा जरा जरा,
रस्ता जरा कच्चाच बांधेन म्हणजे परत बांधायला बरा
तुम्ही मराठी, तुम्ही परप्रांतीय म्हणत राहीन नेहमी,
तरच मतदारांच्या लक्षात राहीन मी नेहमी
भरगोस डोनेशन घेईन तरच देईन admission,
बार भरपूर मिळतील पण मिळणार नाही रेशन
शेतकरी करू देत आत्महत्या धान्य मागवीन चीन जपान वरून,
सगळ्या मिल पाडून कॉम्प्लेक्स बनवेन आपला खिसा भरून
मोबाईल स्वस्त करेन म्हणजे खूश होईल मधमवर्गीय,
मुलभूत गरजांवाचून होत राहील तो स्वर्गीय
शत्रूवर खर्च करेन भरपूर, पोसेन त्याला जेलमध्ये,
दाखवीन त्यांना तुमचीच फक्त आपुलकी माझ्या मनामध्ये
मधमवर्गीय, गरिबांना देईन नोकरी थोडा देईन पगार,
उद्या त्याचाच खिसा रिकामा करून सदा ठेवेन त्याला कामगार
औषधं, पेट्रोल करेन महाग, विष करेन स्वस्त,
पटापट मारतील गरीब आत्महत्या करून मस्त
न फिटे कधी हे भ्रष्टाचाराचे जाळे,
आम्ही असेच सदैव आनंदी आंधळे!!!!!!!!!!!!

No comments:
Post a Comment