स्वप्न पूर्ण होत नाहीत तरी मन काही ऐकत नाही,
तीच तीच स्वप्न पुन्हा बघितल्याशिवाय मन कुठे रमत नाही
का कुणास ठाऊक पण मनाचा लागतच नाही ठाव,
मन तिच्यासाठीच रडतंय जिने मनावर घातलाय घाव
सकाळी मन म्हणत आता तिची प्रतिमा पूर्णपणे पुसून टाकायची,
संध्याकाळी मात्र ते बदलतं, म्हणतं तिची अजून एकदा समजूत काढायची
ती गेलेय सोडून कायमची एकट्याला हे मनाला कळतंय,
पण तिच्याच आठवणींनी मात्र ते सदा कळवळतय
तिने दिलेल्या जखमांनी हे मन नेहमी रडत बसेल,
पण तिच्यासाठीच प्रेम मात्र मनाच्या एका कोपऱ्यात कायम असेल.......
No comments:
Post a Comment