Sunday, September 4, 2011

मनोगत

 तुम्हाला झोपायला छान गाद्या उशा असतात,
आम्हाला मात्र ब्रिजखालचा रस्ता, फूटपाथ खुले असतात
तुमच रडणं थांबवायला तुमचे आईवडील असतात,
आम्हाला तुमच्या  आईवडिलांचे गाडीतून सहानुभूतीने बघणारे डोळे असतात
तुमचं मन रमवायला गेम, कार्टून असतात,
आमची मन रस्त्यावरच्या गाड्या, accidents बघूनच रमतात
तुम्ही गाड्यांमधून आम्हाला, आम्ही गाड्यांमध्ये तुम्हाला बघत असतो,
तुम्ही आमच्यासारखे कधीच न होण्याची, आम्ही तुमचं जीवन जगण्याची स्वप्नं बघत असतो
तुम्ही दुसऱ्यावर रागावून शिवीत आमचं नाव घेता भिकारी,
पण तुमच्यासारख्याने १० रुपये जरी दिले तरी वाटते ती लॉटरी
तुमचे वडील तुम्हाला मोठं करण्यासाठी कमावतात,
आमच्याकडे मात्र आमच्या कमाईवर रात्री दारू पितात
तुम्हाला सणासुदीला मिळतात नवे कोरे महागडे कपडे,
आम्हाला तुमचेच वापरलेले जुने, जे अंगाला होतात वेडेवाकडे
नका करू आम्हाला मदत, आणि इज्जतही देऊ नका,
पण कृपा करून भिकारी या शब्दाचा शिवी म्हणून वापर करू नका...
 
 

No comments: