मी, मीच माझा, न माझा कोणी सोबती,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आडवी येतेय साडेसाती
नाही करत परवा कुणाची जगतो मी स्वच्छंदी,
तरी जीवनाच्या कारागृहात मीच माझा बंदी
नशीबच आमचे बेकार की कर्तृत्वच पडतंय कमी,
सिक्वेंस कधीच लागत नाही, नेहमी हरतोय आयुष्याची रमी
कीक मारून गाडी जातेय पुढे पण थोड्याच वेळात पेट्रोल संपतंय,
success कुठे दिसतच नाही, struggle मात्र जाम लांबतंय
याच जन्मीची पापं म्हणायची की भोग गतजन्मीचे ,
तोंडाशी आलेला घास निसटणार हे झालेय आता नेहमीचे
पहाटेची स्वप्न पूर्ण होतात यावर आता विश्वासच नाही,
विश्वास ठेवावा म्हटला तरी पहाटे झोपच लागत नाही
"आलीया भोगासी असावे सादरं" असेच आता जगावे,
म्हणतात न "अंथरूण बघून मगच पाय पसरावे"

No comments:
Post a Comment