गेलो होतो सिंहगडावर, शेवटचा टप्पा होता आमच्या टूरचा,
तेव्हाच समजला महाराज किती विचार करायचे दूरचा,
महाराजांना कसे कळले होते, भविष्यात आपल्या माणसांना पिकनिक spot ची गरज पडेल,
पाहून गडाची अवस्था ती जिजाऊही ढसाढसा रडेल,
गड राहिलाय फक्त as a "Lovers park " couples साठी,
महाराज असते आज, तर रडले असते "का लडलो मी अशा माणसांसाठी?"
गडाला लागली आहे नुसती अवकळा,
खरंच राजांचे अश्रू गळत असतील घळाघळा,
लोक फक्त जातात गडावर खाण्यासाठी झुणका भाकरी,
त्यापेक्षा बरी होती मुघलांची चाकरी !!!

2 comments:
अरे आमचा ज्ञानेश इतके छान लिहितो हे आम्हास ठाऊक नव्हते....मित्रा लिहित रहा
ज्ञान्या
खरच लिहित रहा !
पुलेशु
Post a Comment