Sunday, January 30, 2011

आठवण...

 
असेच जुने फोटो चाळताना तुझा फोटो  समोर आला,
आणि नकळतच पाण्याचा थेंब त्यावर पडला
ठरवलं होतं तुला पूर्णपणे विसरून जायचं,
आठवणीने मन भरून आलं तरी हसतच राहायचं
पण नाही जमलं तुझं माझ्यातलं अस्तित्व संपवणं,
म्हणून सोडून दिलंय मी तुला विसरायचं पुन्हा पुन्हा ठरवणं
सोपं असतं जगासमोर दु:ख लपवून सदा हसणं,
पण नाही जमत एकांतात स्वत:ला फसवणं
नाही माहीत मला, पण कदाचित तू मला विसरलीही असशील,
पण उचकी लागली तर उगाच वाटतं तूच आठवण काढली असशील
तू सोबत असताना खूप स्वप्न बघितली होती आपल्या एकत्र भविष्याची,
तू गेलीस मात्र रंगतच उडालेय या आयुष्याची
तुझ्याबरोबर जीवन हिरवागार जंगल वाटायचं,
माहीत नव्हतं तुझ्याविना तेच जंगल होतं वणव्यासारखं पेटायचं
प्रयत्न करून सोडेन मी तुझ्या आठवणीत रमणं,
कारण कठीण असलं तरीही भाग आहे तुझ्याविना जगणं......

1 comment:

premal said...

sahi lihili aahes kavita rhudayala sparsha karnari.....