आला आला वसंत दरवळला मातीचा सुगंध,
पहिल्या पावसाने बहरून गेलं जीवन सबंध
चित्रकाराच्या चित्रासारखा पुन्हा होईल निसर्ग हिरवागार,
इंद्रधनुतले रंगही लुभावतील मन अपार
पुन्हा चढेल या ईश्वराच्या चमत्काराची धुंदी,
नव्या ऋतूने होईल नवआनंदाची नांदी
आता खुलून येईल रंगत या जीवनाची,
ओले चिंब होण्यात सुद्धा मजा असेल प्रणयाची
आता संपलेय प्रतिक्षा त्या चातकाची,
चला मिळून मजा लुटुया या पावसाळ्याची!!!!!!!!

1 comment:
very nice dnyanu....!!
Post a Comment