Saturday, February 12, 2011

तू....

तुझ्या कपाळावर रुळणारी बट वाढवतेय तुझ्या सौंदर्याची शोभा,
तुला पाहून वाटतेय जणू अप्सारेसमोर मी उभा
सुबक चेहऱ्याला साजेसा तुझा सावळा रंग,
तुझ्या एका लूक नेच शहारून येतेय अंग
काळेभोर केस तुझे कोमल तुझी काया,
तुझ्या एका smile साठी सारे जीवनही घालवीन वाया 
गालावर सुंदर खळी डोळ्यामध्ये अजबच नशा,
वेड लावतील मला अदा तुझ्या अशा
रूप तुझे पाहून मी स्वप्नांच्या जगात हरवतो,
म्हणून तुला पाहण्यातच मी माझे मन रमवतो
तूच माझी ऐश्वर्या तूच माझी माधुरी,
तुझ्याविना आता आहे माझी कहाणी अधुरी
दिलीस तू साथ तर सजवूया आपली प्रेमकहाणी,
सांग ना एकदाच होशील का तू माझ्या प्रेमाच्या महालाची राणी ????